स्‍वातंत्र्यदिनाच्‍या ७५ व्‍या वर्धापनदिनाचे औचीत्‍य साधुन महसुल अभियाना अंतर्गत मौजे वाढवणा येथील ५०६ लाभार्थ्‍याना शिधापत्रीका वाटप

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या ७५ व्‍या वर्धापनदिनाचे औचीत्‍य साधुन महसुल अभियाना अंतर्गत मौजे वाढवणा येथील ५०६ लाभार्थ्‍याना शिधापत्रीका वाटप

उदगीर (एल.पी.उगिले) : आ.संजय बनसोडे उदगीर तथा माजी गृह राज्‍य मंत्री यांचे संकल्‍पनेतुन तसेच जिल्‍हाधिकारी लातुर यांचे मार्गदर्शनाखाली उदगीर चे कर्तव्‍यदक्ष तहसीलदार रामेश्‍वर गोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मौजे वाढवणा येथील शिधापत्रीकाधारकांना शिधापत्रीका वाटप करण्‍याचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला.
कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी गावचे प्रथम नागरीक तथा सरपंच नागेश थोंटे होते. कार्यक्रमात कल्‍याण पाटील माजी सभापती जिल्‍हा परीषद लातुर व प्रा. शाम डावळे तसेच अनंप पारसेवार जिल्‍हा उपाध्‍यक्ष ग्राहक मंच लातुर यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिवशंकर बेंबळगे नायब तहसीलदार पुरवठा यांनी केले. तसेच सुत्रसंचालन गणेश हिवरे मंडळ अधिकारी वाढवणा यांनी केले. कार्यक्रमात मौजे वाढवणा येथील एकुण चार रास्‍त भाव दुकानातील एकुण ५०६ लाभार्थ्‍यांना प्राथमीक स्‍वरुपात शिधापत्रीका तहसीलदार रामेश्‍वर गोरे यांचे हस्‍ते वाटप करण्‍यात आल्‍या .सदर कार्यक्रम हा तालुक्‍यात १००% राबविण्‍यात येणारअसल्‍याचे रामेश्‍वर गोरे तहसीलदार उदगीर यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले असुन मौजे वाढवणा येथील जनतेस शिधापत्रीका संदर्भात समस्‍यांबाबत चर्चा करण्‍यात आली.
तसेच शासनाच्‍या प्रत्‍येक योजनेची माहिती दिली. त्‍यात सर्व शेतक-यांनी ई पीक पाहणी १०० % करणे करीता सर्वांनी आपल्‍या पीकाची नोंद करुन घेण्‍याच्‍या सुचना दिल्‍या . १५ सप्‍टेंबर पर्यंत सर्वांनी आपले मतदान कार्ड हे आधारकार्ड सोबत लिंक करुन घेण्‍याचे आवाहन केले. तसेच मौजे वाढवणा येथील लाभार्थ्‍यांना संजय गांधी योजनेचे परीपुर्ण अर्ज देण्‍याकरीता सुचना दिल्‍या, त्‍याअनुषंगाने सर्व पात्र लाभार्थ्‍यांच्‍या अर्जावर नियमानुसार मंजुरी देण्‍यात येईल असे सांगितले.
ज्‍या शेतक-यांचे सोयाबीन चे नुकसान झाले आहे. त्‍यांबाबत अहवाल शासनास पाठवुन दिला असुन शासनाच्‍या सुचनेप्रमाणे अनुदान प्राप्‍त झाल्‍यानंतर वाटप करण्‍यात येईल असे सांगितले. कार्यक्रमात दत्‍ता बामणे माजी पंचायत समिती सदस्‍य . ज्ञानेश्‍वर क्षिरसागर(माळी) उपसरपंच वाढवणा, पुरवठा विभागाचे अव्‍वल कारकुन मंजुर मुलतानी शेख व मौजे वाढवणा तलाठी आकाश आलुरे व वाढवणा गावातील शिधापत्रीकाधारक लाभार्थी तसेच शेतकरी इत्‍यादी उपस्थित होते.

About The Author