लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान महत्त्वाचे : तहसीलदार रामेश्वर गोरे

लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान महत्त्वाचे : तहसीलदार रामेश्वर गोरे

उदगीर : विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे व प्रत्येक निवडनुकीमध्ये मतदानाचा हक्क कर्तव्य समजून बजावावा. तसेच आपले मतदान कार्ड आधार ओळखपत्रासी जोडून आपल्या कुटुंबात व परिसरामध्ये जाणीव-जागृती करावी. कारण लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदान हे खूप महत्वाचे असते असे मत तहसीलदार रामेश्वर गोरे यानी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय. क्यू. ए. सी. विभागाच्या वतीने मतदार कार्ड आधार ओलखपत्रासोबत लिंक करण्यासाठी आयोजित केलेल्या जाणीव-जागृती कार्यशाळेमध्ये बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव हे होते तर व्यासपीठावर नायब तहसीलदार संतोष गुट्टे, उप-प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ. एस. व्ही. शिंदे, ग्रंथपाल डॉ. व्ही. एम. पवार इत्यादि उपस्थित होते
पुढे बोलताना रामेश्वर गोरे यांनी लोकशाहीसाठी युवकांनी कर्तव्य भावनेतून पुढे यावे असे आवाहन केले.तर संतोष गुट्टे यांनी मतदान कार्ड लिंक करण्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. जाधव यांनी तरुण हे लोकशाहीचे आधार असल्याचे स्पष्ट करत पुस्तकीय माहितीसोबत व्यवहारकुशल होण्याचा संदेश दिला.
प्रा. बालाजी सूर्यवंशी यानी कार्यक्रमाचे संयोजन व संचलन तर डॉ. व्ही. एम. पवार यानी आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. के. डब्ल्यू. गुट्टे, डॉ. एस. डी. निटूरे, केंद्रे मॅडम व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author