अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाला एम. ए. हिंदी ची मान्यता
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात नव्याने एम.ए. हिंदी पदवीव्युत्तर पाठ्यक्रम सुरू करण्याची मान्यता नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दिली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय परिक्षेत्रातील एक आदर्श अभ्यास केंद्र म्हणून महात्मा फुले महाविद्यालयातील अभ्यास केंद्राची ओळख आहे. या अभ्यास केंद्रात नव्याने एम. ए. हिंदी ह्या पदवीत्तर अभ्यास केंद्रास मान्यता मिळाली असून, याबाबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालयाचे सहायक कुलसचिव डॉ. चंद्रका़त पवार, संचालक डॉ. बी. के. मोहन यांचे सहकार्य लाभले. महात्मा फुले महाविद्यालयात एम. ए. हिंदी प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत. अशी माहिती प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी दिली. तसेच, एम. ए. हिंदी, एम.ए. मराठी, बी.ए. या पाठ्यक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व केंद्र संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.