नीट 2022 परीक्षेत स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे घवघवीत यश
शिरूर ताजबंद (गोविंद काळे ) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नीट 2022 परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कु. कोयले तेजल मोहनराव 681 गुण घेऊन देशात 815 वी आली आहे. तुपकर गौरव राजू याला 619 गुण तर नळगिरे सय्यद हुसेन सय्यद हाफिज याने 540 गुण घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. सदरील महाविद्यालय ग्रामीण भागातील असले तरी गुणवत्तेच्या दृष्टीने येथील विद्यार्थी कुठेही कमी नाहीत हे वरील विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. वरील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, सचिव आमदार बाबासाहेब पाटील, सहसचिव बळीराम भिंगोले गुरुजी तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. डी. जी. माने, उपप्राचार्य व्यंकट कीर्तने, विज्ञान शाखेचे प्रा. मोरे एम. व्ही., प्रा. बिलापट्टे एन. एस., प्रा. मनिषा शेळके, प्रा. गुडसुरकर एन. एल. तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी अभिनंदन करून भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.