लक्ष्मणराव साळुंके यांचे दुःखद निधन

लक्ष्मणराव साळुंके यांचे दुःखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक लक्ष्मणराव ज्योतीराम साळुंके यांचे वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दि. आठ रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि 9 रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या मूळ गावी साळुंकवाडी तालुका अहमदपूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार असून प्रसिद्ध पोट विकार तज्ञ डॉ. बालाजी साळुंके व मुंबई स्थित प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. महेश साळुंके यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!