अहमदपुरात भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्याचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) :अहमदपूर व चाकुर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांचा उद्या दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 02 वाजता अहमदपूर शहरातील नांदेड रोड वरील सानवी मंगल कार्यालयात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील मेळाव्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय मंत्री, भगवंतजी खुबा यांच्या सह खासदार सुधाकर क्षृंगारे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रमेश अप्पा कराड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव केंद्रे यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.सदरील मेळाव्यास भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदपूर व चाकुर तालुका अध्यक्षानी केले आहे.