राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आ.रमेशआप्पा कराड यांची विविध विकास कामासाठी निधीची मागणी
लातूर (एल.पी.उगिले) : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण ग्रामविकास तथा पंचायत राज विभागाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांची बुधवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करून ग्रामीण भागातील विविध गावच्या विकास कामांना मंजुरी देण्याची आ. रमेशआप्पा कराड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असता, मंत्री ना. गिरीश महाजन यांनी निश्चितपणे विकास कामांना भरीव निधी देऊन विविध गावच्या विकास कामांना गती दिली जाईल असे बोलून दाखविले.
यावेळी प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राजकारण साठे, संतोष चव्हाण यांच्यासह अनेक जण होते.