निर्मोही व्यक्तीमत्व : निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे)

निर्मोही व्यक्तीमत्व : निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे)

समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्ती आपली प्रगती करावी, ही अपेक्षा ठेवून कार्य करत असते. मात्र फार कमी लोक आपण जे कार्य केले, ते कार्य समाज हिताचे असावे. असा अट्टाहास ठेवतात. त्यात निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांचा अग्रक्रम लागतो.

आपण या समाजातून मोठे झालो, म्हणजेच आपण या समाजाचे काही देणे लागतो. याची जाण आणि भान कायम ठेवून कार्यरत राहणारे निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) हे एक निर्मोही व्यक्तिमत्त्व आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण ते दोन वेळा नगरसेवक होते. मात्र या काळात कंत्राटदारी, गुत्तेदारी किंवा कोणाचे काम करतो म्हणून पैसे घेणे, अशा पद्धतीचा कोणताही आरोप त्यांच्यावर कधीच कोणी करू शकले नाही. किंवा केले नाही!
आपल्या प्रभागात तर ते लोकप्रिय आहेतच आहेत, शिवाय संपूर्ण उदगीर मध्ये एक धडाडीचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. याचाच परिपाक म्हणून उदगीर शहरातील सिद्धार्थ सोसायटी, दत्तनगर, मुसा नगर, संजय नगर, गोविंद नगर, चंद्रमादेवी नगर, किल्ला गल्ली, बोधन ची आई भाग, म्हाडा कॉलनी इत्यादी प्रभागातून कार्यकर्त्यांनी निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करायचा निर्धार केला आहे.
विशेष म्हणजे हा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला जावा. असाही अट्टाहास कार्यकर्त्यांचा राहणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुश्मिताताई माने, रवी जवळे, बंटी घोरपडे, अखिल भाई शेख, मुकरम जागीरदार, साबेर पटेल इत्यादी नेत्यांनी दिली आहे.

निवृत्तीराव सांगळे (सोनकांबळे) यांच्या वाढदिवसाच्या निमत्ताने दर्ग्याला चादर अर्पण करणे, वृक्षारोपण करणे, गोरगरिबांना निष्ठांन भोजन देणे, रुग्णांना फळे वाटप करणे, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, वयोवृद्ध व्यक्तींसाठी मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिरांच्या आयोजन करणे. असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस समाजकार्यातूनच करावा. या उद्देशाने बेघर असलेल्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे करणे. असे उपक्रम राबवले जाणार आहेत.

अशीही माहिती याप्रसंगी संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी सामाजिक कार्याची जाण आणि भान ठेवून वेळप्रसंगी स्वतःच्या शिक्षणाला बाजूला ठेवून, सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. त्या काळात नामांतराची चळवळ नुकतीच सुरू झाली होती. त्या चळवळीत पूर्ण झोकून देऊन त्यांनी काम केले. इतकेच नाही तर त्या काळात ग्रामीण भागात गोरगरीब, दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक, उपेक्षित, शोषित घटकांना प्रस्थापिताकडून त्रास दिला जायचा. त्याच्या विरोधामध्ये आवाज उठउन संपूर्ण तालुक्यात गोरगरिबांचा कैवारी बनण्याचे पुण्य या नेत्याने घेतल्यामुळेच दलित मुस्लिमांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही.

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे. हा त्यांचा स्वभाव आहे. कर्म धर्म संयोगाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने, आई-वडिलांच्या पुण्याइने घरून बऱ्यापैकी श्रीमंती असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करावा, असा त्यांना विचारही कधी शिवला नाही. कित्येक श्रीमंत असलेले लोक देखील हावरटपणाने आणखी पैसे मिळावेत, म्हणून चुकीचा मार्ग अवलंबत असतात. मात्र निवृत्तीरावांनी कधीही गुत्तेदारी किंवा चुकीच्या मार्गाने पैसा मिळवावा असे केले नाही.
त्यामुळेच त्यांची लोकप्रियता आज शिगेला पोहोचली आहे. अशा या लोकप्रिय नेत्याला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
त्यांच्या भावी आयुष्यास राष्ट्रीय दलित अधिकार मंच, एम आय एम, अखिल भारतीय दलित पॅंथर यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

About The Author

error: Content is protected !!