उदगीर येथे मनसेचे रास्ता रोको आंदोलन संपन्न

उदगीर येथे मनसेचे रास्ता रोको आंदोलन संपन्न

उदगीर : गेल्या 55 दिवसापासून उदगीर मधील नांदेड बिदर या मुख्य रस्त्यावरील पक्के अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उदगीर पत्रकारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या धरणे आंदोलनाच्या समर्थनार्थ आज दिनांक 9 9 2022 रोजी महाराष्ट्र निर्माण सेना शाखा उदगीरणे शिवाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करून पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
गेल्या दोन वर्षात उदगीर विधानसभेत अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत पण या विकास कामाच्या बाबतीत सांगायचे झाले तर आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय अशी गत झालेली दिसत आहे उदाहरणात नांदेड बिदर या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे न काढता रस्त्याची रुंदी कमी करून जसं जमेल तसे कुठे 90 फुटाचा कुठे 80 फुटाचा कुठे 75 फुटाचा सापडेल तसा रस्ता करण्याचे काम चालू आहे तसेच नॅशनल हायवे क्रमांक 63 वर काम पूर्ण होणे आधीच खड्डे पडणे गेल्या दोन-तीन महिन्यात झालेल्या ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यांना त्यांचे नवे पण फिटण्याअगोदरच त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात उदगीर एनकी रोड, शेल्हाळ पाटी ते तदलापूर रोड या रस्त्यांना तयार करून दोन महिन्याच्या आत हे रस्ते फुटून त्यांना प्रचंड खड्डे पडले आहेत अशाच प्रकारे तहसील, विश्रामगृह, पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम असेल या इमारतीच्या कॉलमला आत्ताच पाझर फुटायला लागला आहे उदगीर विधानसभेतील बहुतेक कामेही बोगस निकृष्ट दर्जाची केली जात आहेत कोणी कितीही आंदोलन करा तक्रारी द्या आमचे कोणीही काहीही वाकडे करु शकत नाही अशा अविर्भावात ठेकेदार मंडळी वावरत आहेत यांच्या पाठीमागे वरदहस्त कोणाचा आहे ? याच्यावर कारवाई का होत नाही ? अशीच निकृष्ट दर्जाची कामे होत राहणार का ? असे अनेक प्रश्न उदगीरवासीयांना पडत आहेत.
सर्व स्तरावरून अतिक्रमण काढण्याच्या सूचना होऊन ही अतिक्रमण का काढले जात नाही? या प्रश्नाचा उत्तराखातर उदगीर पत्रकारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून अतिक्रमण काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा पत्रकारांनी घेतला आहे या त्यांच्या निर्णयाचे महाराष्ट्र निर्माण सेना स्वागत करत असून मनसे त्यांच्या समर्थनार्थ आपली पूर्ण ताकद उभी करत असून आजच्या रास्ता रोकोंनी त्याची सुरुवात केली आहे अतिक्रमान काढापर्यंत मनसे पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील व वेळोवेळी तीव्र आंदोलन हाती घेऊन या अतिक्रम हटावा मोहिमेस बळ देईल तरी प्रशासनाने आता तरी जागे व्हावे व तत्काळ अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी अन्यथा मनसे यापुढे आक्रमक आंदोलने हाती घेईल याची नोंद घ्यावी.

आपला :- संजय राठोड, जिल्हाध्यक्ष , लातूर

About The Author