एम आय एम चे ठरले पक्के !!
दलित मुस्लिम आघाडीने शोधले तीन समाजसेवक रुपी हुकमी एक्के !!!

एम आय एम चे ठरले पक्के !!<br>दलित मुस्लिम आघाडीने शोधले तीन समाजसेवक रुपी हुकमी एक्के !!!

उदगीर नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस पक्षाने तर खूप पूर्वीच स्वबळाचा नारा देऊन आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. असे असले तरीही स्थानिक पातळीवर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची कुवत काँग्रेस पक्षामध्ये आहे, असे म्हणता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने अर्थात माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी शहरात निर्माण झाली आहे. गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता, हेच गुऱ्हाळ पुन्हा पुन्हा काँग्रेस जण गाळत असतील तर ते चुकीचे ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, इच्छुक उमेदवारांनी खूप दिवसापूर्वीपासून निवडणुकीची तयारी, तेही राष्ट्रवादीच्या स्वबळावर लढण्याची केलेली आहे! त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतची बाब असली तरी एम आय एम पक्षाने गेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या निसटत्या पराभवाच्या अनुषंगाने निरीक्षकांना पाठवून अंदाज घेतला आहे. या निरीक्षकाच्या अंदाजाने, बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एम आय एम, राष्ट्रीय दलित अधिकार मंच, अखिल भारतीय दलित पॅंथर आणि समविचारी दलित मुस्लिम आघाडीतील इतर पक्ष यांच्याशी आघाडी करत पारंपारिक पक्षाला कोलदांडा घालण्याचा डाव रचला आहे.
एमआयएमचे सर्वेसर्वा विधीज्ञ बॅरिस्टर आसुसोद्दीन ओवैसी यांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेत्यांनी आपापल्या पातळीवर निर्णय घ्यावेत, आणि विजय मिळवावेत, असे संकेत दिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर तीन वेळा उदगीर नगर परिषदेत नियोजन व विकास सभापती राहिलेले राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष,मागास प्रवर्गातील संभाव्य उमेदवार निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) किंवा त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सलग दोन वेळा नगरपरिषदेमध्ये आपले वर्चस्व दाखवलेले ओ बी सी प्रवर्गातून माजी नगरसेवक साबिर पटेल आणि यदाकदाचित अध्यक्ष पदाची सोडत खुल्या प्रवर्गासाठी सुटली तर सामाजिक जाण असलेले आणि गोरगरिबांची सेवा करणारे डॉक्टर शाहिद शेख यांची चर्चा सुरू केली आहे.
एम आय एम, राष्ट्रीय दलित अधिकार मंच, अखिल भारतीय दलित पॅंथर आणि समविचारी गटाचे काही कार्यकर्ते, नेते यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी एम आय एम आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निरीक्षक आवर्जून उपस्थित झाले होते.
या निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गेल्यावेळी झालेल्या चुका दुरुस्त करून विजयश्री खेचून आणायची असा निर्धार करण्यात आला आहे. नगराध्यक्ष पद हे संपूर्ण जनतेतून निवडून येणार असल्याने सर्व जनतेला परिचित असलेले चेहरे म्हणून आणि सामाजिक जाणीव जपणारे समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे, ते राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) तसेच एम आय एम चे ज्येष्ठ नेते तथा दोन वेळा नगरपालिकेवर वर्चस्व गाजवलेले आणि विकासाची जाण असलेले साबेर पटेल हे ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख यदाकदाचित आरक्षण जर ओबीसी प्रवर्गासाठी सुटले तर साबिर पटेल हे उमेदवार राहणार आहेत. तसेच खुल्या प्रवर्गातून जर निवडणूक आरक्षण राहिले तर समाजसेवक डॉक्टर शाहेद शेख यांच्या नावाचा उल्लेख बैठकीमध्ये निश्चित करण्यात आला.
सदरील बैठकीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय संविधानाचे रक्षण करणारी विचारधारा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे, आणि समाजाला आपली भूमिका समजावून सांगावी. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला कोणी हात लावत असेल तर ते खपवून घेणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. असे विचार या बैठकीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी मांडले.
तसेच साबिर पटेल आणि डॉक्टर शाहेद शेख यांनी देखील समायोजित विचार मांडले. समाजामध्ये भाईचारा टिकून राहावा, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उमेदवार निश्चितीचा अंतिम अधिकार ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून एम आय एम चे सर्वेसर्वा बॅरिस्टर आसुसोद्दीन ओवेसी यांनाच राहील, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.
गेल्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला. त्यामुळे निसटता पराभव सहन करावा लागला. मात्र आता साम, दाम, दंड, भेद या राजकारणामध्ये चालणाऱ्या सर्व नितीचा वापर दलित मुस्लिम आघाडी निश्चितपणे करेल! अशीही चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली.
तसेच कंबर कसूर या निवडणुकांमध्ये उतरायचे असा विश्वास देखील एमआयएमच्या प्रवक्त्याच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी एमआयएमचे कार्याध्यक्ष शेख मुसा पठाण, उपाध्यक्ष जमील बागवान, सोशल मीडियाचे शहराध्यक्ष व शहर सचिव मुल्ला महबूब, मुक्रम जागीरदार, एमआयएमचे नेता माजी नगरसेवक साबिर पटेल, शेख मुसा, सय्यद वासिम, अहमद खान, शहर प्रवक्ता मौलाना अजीम पटेल, अरफत हाश्मी, बबलू पठाण, इरफान दायमी, शेख हाजी, वाजीद हाश्मी, माजी नगरसेवक फकीर हश्मी, अजहर हाश्मी, छोटू हाश्मी, इरफान हाश्मी, उबेद जरगर, सलमान दायमी, फाईम सातभाई, अरफत सिद्दिकी इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी या बैठकीमध्ये नगरपरिषदेच्या सोबतच इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहभागी होणाऱ्या मित्र पक्षांना कशा पद्धतीने सामावून घ्यावे? या अनुषंगाने ही चर्चा झाली. एन केन प्रकारे विजय मिळाला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, नशिबाने ज्यांना संधी मिळेल त्यांना इतर सर्वांनी सहकार्य करावे. असेही या बैठकीत सर्वानुमते ठरले. तसेच निवडणुकीच्या दरम्यान एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील आणि बॅरिस्टर आसुसोदिन ओवैसी यांच्या सभांच्या नियोजनाच्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुकांची सुरुवात झाल्यानंतर इतरही कोणी समविचारी पक्ष सोबत येत असेल तर त्यांनाही सोबत घ्यावे असेही सर्वानुमते ठरले.
———_——-_———–
सुस्मिताताई माने बंटी घोरपडे रवी जवळे अखिल भाई शेख मुकरम जागीरदार साबिर पटेल
——————++—++

About The Author