प्रा.एन.आर. लांजे यांचा सेवानिवृत्ती कार्य गौरव सोहळा

प्रा.एन.आर. लांजे यांचा सेवानिवृत्ती कार्य गौरव सोहळा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एम.सी.व्ही.सी. विभाग प्रमुख प्रा. एन. आर. लांजे हे ३२ वर्षाची सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, प्रा. बी. एस. बाबळसुरे, सत्कारमूर्ती श्री व सौ. प्रा. एन. आर. लांजे, विजयाताई लांजे, मुलगी शितल लांजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भर पेहराव, शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले, सेवा काळात त्याग अन् समर्पन भावनेतून केलेले कार्य उल्लेखनीय असे होते. यापुढील काळात ही आपले योगदान महत्त्वाचे राहणार आहे. सुत्रसंचालन रसूल पठाण यांनी केले. तर आभार वर्षा कवडगावे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!