नवनाथ गायकवाड यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लातूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर जिल्हयाच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता एन. डी. शिंदे यांच्या शुभहस्ते नवनाथ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.के. मुरळीकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठवाडा संघटक ॲड. पांडुरंग शिवलीकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कबाडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवजीराव दामावाले, पवन बनसोडे व प्रा.सौ. पुष्पा नवनाथ गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
