सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयात हिंदी दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयात 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.अ. श्री. बिराजदार जी.बी.होते. प्रमुख पाहुणे उदयगिरी महाविद्यालय,उदगीर येथील प्राध्यापक प्रवीण जाहुरे होते.हिंदी साहित्याचे कहानीसम्राट मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी हिंदी सुविचार,दोहे व अर्थ,चुटकुले, देशभक्तीपर गीत, भावगीत,बोधकथा, पहेलियाॅं,भाषण असे विविध गुणदर्शन सादरीकरण केले. दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘दूरदर्शन ‘ ही सौ.टेंकाळे लिखित नाटिका सादर केली.
प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्रवीण जाहुरे यांनी भाषेचे महत्त्व सांगून हिंदी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे असे सांगितले.अध्यक्षीय समारोप बिराजदार जी.बी यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हिंदी विषय शिक्षिका सौ. टेंकाळे डी.पी.यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गव्हाणे व्ही.के. , पाटील बी.एम., कांबळे के. जी., घोडके एच.बी.,सौ.रेवता जाधव यांनी सहकार्य केले.
