श्यामार्य कन्या विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

श्यामार्य कन्या विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामार्य कन्या विद्यालयामध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मुन्शी प्रेमचंद, व्योहार राजेंद्र सिंह या हिंदी लेखकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विषय शिक्षिका प्रेमा होन्ना यांनी केले.
श्यामार्य कन्या विद्यालयातील स्नेहा मोरतळे, अर्शिया शेख, मानवी देवनाळे, कोमल मुंडकर, सृष्टी देमगुंडे, नेहा गटोडे ,कांचन मोरे ,नीता कंदले, आशावरी सोनकांबळे ,अनुश्री पाटील, प्रतीक्षा बंडरे, साक्षी मलकापूरे, साक्षी बिरादार, दीक्षा पाटील, सृष्टी कडोळे, पुनम कसबे, स्नेहा बिरादार, श्रावणी चव्हाण, या मुलींनी भाषण , नृत्य , गीत गायन, यामध्ये सहभागी झाल्या होत्या .
१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या बावीस भाषांना राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. असे मनोगतातून हिंदी विषय विभाग प्रमुख श्री विजय बैले यांनी माहिती दिली.
सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेने भरलेल्या देशात – पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण, शतकानुशतके, अनेक भाषांनी संपर्क टिकवून ठेवण्याचे काम केले आहे. हिंदी ही त्यातील प्रमुख भाषांपैकी एक भाषा आहे आणि हिंदी भाषेच्या योगदानाची वेळोवेळी प्रशंसा झाली आहे. याशिवाय हिंदीने भारताला एकतेच्या धाग्यात जोडण्याचे काम केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून हिंदी हे राष्ट्रीय एकात्मता आणि अस्मितेचे प्रभावी आणि शक्तिशाली माध्यम आहे. हिंदीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यातील वैज्ञानिकता, मौलिकता, साधेपणा, आकलन आणि स्वीकारार्हता. असे मनोगतातून संस्कृत विषय विभाग प्रमुख श्री सतनप्पा हुरदळे यांनी मत व्यक्त केले.
हिंदी दिनी अनेक कार्यक्रम होतात. या दिवशी विद्यार्थ्यांना हिंदीचा आदर करण्यास आणि दैनंदिन व्यवहारात हिंदीचा वापर करण्यास शिकवले जाते. ज्यामध्ये हिंदी निबंध लेखन, वादविवाद, हिंदी टायपिंग स्पर्धा इ. हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना हिंदीसाठी प्रेरित करण्यासाठी भाषा सन्मान सुरू करण्यात आला आहे. असे अध्यक्ष समारोपातून श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते यांनी आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मोरतळे आणि आभार वैशाली अणकल्ले यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!