काँग्रेस स्वयंरोजगार व रोजगार सेल च्या जिल्हाध्यक्षपदी मुकेश राजमाने यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस स्वयं रोजगार व रोजगार सेल च्या लातूर जिल्हाध्यक्षपदी मुकेश राजमाने यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबत प्रदेश काँग्रेस स्वयं रोजगार व रोजगार सेल चे अध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांनी जाहीर केले आहे. माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते मुकेश राजमाने यांना मंगळवारी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, काँग्रेस स्वयं रोजगार व रोजगार सेल चे लातूर शहर काँग्रेस अध्यक्ष सिकंदर पटेल, साई गावचे उपसरपंच अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
नियुक्ती केल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त करून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वयं रोजगार व रोजगार सेल ची लवकरच जिल्हा कार्यकारणी जाहीर करून पक्षांचे कार्य वाढवणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष मुकेश राजमाने यांनी सांगितले.
