श्यामलाल हायस्कूल मध्ये हिंदी दिन व संस्कृत दिन उत्साहात साजरा

श्यामलाल हायस्कूल मध्ये हिंदी दिन व संस्कृत दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन व संस्कृत दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती स्मिता तिवारी उपस्थित होत्या.
व्यासपीठावर प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये, हिंदी विभाग प्रमुख विष्णुकांत चेरेकर, संस्कृत विभाग प्रमुख प्रमोद कावरे, मराठी विभाग प्रमुख प्रवीण भोळे, इंग्रजी विभाग प्रमुख संजय देबडवार तसेच ज्येष्ठ शिक्षिका ऐतनबोने शीलन, जाधव धनश्री उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरादार सृष्टी,भोसले राधिका, यगारे गायत्री या विद्यार्थिनींनी हिंदी व संस्कृत भाषेत अतिशय प्रभावी रीत्या केले.
हिंदी भाषेचे महत्व नवटक्के सृष्टी तर संस्कृत भाषेचे महत्व रागिनी ढगे या विद्यार्थिनींनी प्रभावी भाषेत व्यक्त केले.
संस्कृत भाषेत स्वागत गितिका अनुष्का पाठक,वैष्णवी कावळे, वैष्णवी श्रीमंगले या विद्यार्थिनींनी सादर केले.
विविध वेशभूषा प्रभावीरीत्या सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना गोविंद कदम यांनी विशेष मार्गदर्शन केले. विविधतेतून एकता दर्शवणारे नृत्य ,देखावे, गीत, सामूहिक प्रार्थना विद्यार्थ्यांनी सुंदररित्या सादर केले.
प्रमुख अतिथी स्मिता तिवारी यांनी हिंदी दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या, व हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय समारोप यामध्ये मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी हिंदी दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाच्या राष्ट्रीय एकात्मते मध्ये हिंदीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे या भाषेचा मान, सन्मान व विकास आपण सर्व देशवासीय मिळून करूया, असे मनोगत व्यक्त केले. तसेच संस्कृत ही सुद्धा आपली प्राचीन समृद्ध भाषा आहे, संस्कृत भाषेतील साहित्य हे व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा दर्शवणारे साहित्य आहे. त्याचाही अभ्यास आपण करायला हवा. असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य व संस्था पदाधिकारी यांनीही हिंदी दिनाबद्दल संदेशाद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार हिंदी विषय विभाग प्रमुख विष्णुकांत चेरेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!