तरुणांनी जबाबदारीने वर्तन करावे – गोरख दिवे

तरुणांनी जबाबदारीने वर्तन करावे - गोरख दिवे

उदगीर (एल.पी.उगिले) : तरुणांनी जीवनामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. वाहतुकींचे नियम पाळावेत, आणि जबाबदारीने वागावे. असे मत उदगीर शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी काढले . शिवाजी महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने महविद्यालयीन विद्यार्थांसाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे, नॅक मूल्यांकन समितिचे समन्वयक प्रा.डॉ. विष्णु पवार यांची होती.

पुढे बोलताना दिवे म्हणाले की, विद्यार्थ्यानी समाजातील अनेक पैलुवर चर्चा केली पाहिजे .तरुण विद्यार्थांनी पोलिस ,आर्मी व खाजगी व्यवसायकडे लक्ष्य केंद्रित करावे. तसेच आपल्या पालकांचा आदर सन्मान करावा. समाजातील विविध प्रकारच्या गुन्हेगारीला बळी न पड़ता आपली सुरक्षा स्वत: करावी. व जबाबदारीने वागावे.

मोबाइलचा वापर अनावश्यक करू नये. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपण आपल्या परिवारातील व्यक्तिंना प्रवृत्त करावे. व त्यांना हेल्मेटचा वापर करण्यासंबंधी आवर्जून सांगावे. वाहतूक नियमाचे योग्य पालन करुन दूसर्‍या व्यक्तिंना त्याचा त्रास होणार नाही, या बदल काळजी घ्यावी. असेही त्यांनी म्हटले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव अध्यक्षीय भाषणात म्हणाले, विद्यार्थीनी स्पर्धा परीक्षाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. व शासकीय नौकरी मिळवावी, तसेच देश सेवा करावी . कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक शंका, प्रश्न विचारले. त्या शंकांचे निरीक्षण,करून निरसनही पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी केले .कार्यक्रमाचे संचलन क्रीडा संचालक प्रा.नेहाल अहमद यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी ब्रम्हानंद ,सतीश बापुरे,गोविंद पाटील , गणेश वाघमारे, सूर्यवंशी बंडप्पा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author