लातूर येथे मनसेमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश
लातूर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कठोर हिंदुत्ववादी भूमिका लक्षात येतात लातूर जिल्ह्यातील अनेक तरुणांनी लातूर येथे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष संजीवभाऊ राठोड व शहराध्यक्ष मनोज अभंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत गहिनीनाथ सोमवंशी,सोमनाथ गिरी कृष्णा आळंदकर,चैतन्य आळंदकर, कृष्णा सोमवंशी, महेश चेवले, श्रीनिवास संपते आदींनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला.
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले संघटन बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून “गाव चलो, घर घर चलो” असे अभियान राबवून पक्ष संघटनेचे नेतृत्व तथा मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार गाव पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली विचारधारा पोहोचवण्यात यशस्वी होत आहे. परिणामतः येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले वर्चस्व निर्माण केले तर नवल वाटू नये. अशी परिस्थिती सध्या निर्माण होऊ लागली आहे.
यावेळी मनवीसे जिल्हाध्यक्ष किरण चौहान,शेतकरी सेना राज्यउपाध्यक्ष भागवत शिंदे,कामगारसेना जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.