अभिनेता रुद्रा मुरकुटे यांची निवड

अभिनेता रुद्रा मुरकुटे यांची निवड

किनगाव (प्रतिनिधी) : आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी या मराठी चित्रपटात राजकारणी कार्यकर्त्यांची भूमिका व शैतानी खोपडी या हिंदी चित्रपटातील मुख्य खलनायकाची भूमिका बजावणारे रुद्रा मुरकुटे यांची भाजप कामगार आघाडी संलग्न भाजप चित्रपट आघाडीच्या लातूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून संजय केनेकर, गणेश ताटे, चित्रपट कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विजय सरोज व प्रदेश सरचिटणीस सत्यवान गावडे, मराठवाडा प्रभारी तथा नांदेड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लातूर जिल्हा सरचिटणीस पदी अभिनेता रुद्र मुरकुटे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

About The Author

error: Content is protected !!