शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील गणेश विसर्जनासाठी अहोरात्र काम करणारे पोलीस अधिकारी , कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी, व विद्युत कर्मचारी’ यांना 300 ते 400 टिफिन डब्यातुन गणेश विर्सजनाच्या दिवशी संध्याकाळी शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला याविषयी सविस्तर माहीती अशी की, महाराष्ट्रातील यंदा कोरोनाचे सावट दुर झाल्यानंतर तसेच प्रशासनाने गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व निर्बध ऊठवले असल्यामुळे शहरात गणेश उत्सव मोठ्या संख्येने थाटामाटात पार पडला गणेश उत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी अहोरात्र काम करणारे पोलीस अधिकारी , कर्मचारी नगरपरिषद कर्मचारी, व विद्युत कर्मचारी’ यांना 300 ते 400 टिफिन डब्यातुन गणेश विर्सजनाच्या दिवशी संध्याकाळी शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. या महाप्रसादाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवाड, पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल दुरपडे, प्रभाकर अंधोरीकर महावितरण उपकार्यकारी अभियंता प्रदिप काळे सहाय्यक अभियंता सतिष गुडे पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वांभर स्वामी आदींचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आलायावेळी शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी पत्रकार बांधव गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!