उद्योजक शरद जोशींची महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘मिया- वाकी’ प्रकल्पास भेट

उद्योजक शरद जोशींची महात्मा फुले महाविद्यालयाच्या 'मिया- वाकी' प्रकल्पास भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण अशा ‘मिया वाकी’ अर्थात ‘आनंद घन वन’ या प्रकल्पास येथील प्रसिद्ध केमिस्ट व प्रगतशील शेतकरी शरद जोशी यांनी महाविद्यालयाला ग्रंथ भेट देऊन महाविद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी नाविन्यपूर्ण असलेल्या ‘मिया वाकी’ या प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रकल्पाबद्दल उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली विविध, नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबविणारे महाविद्यालय म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाची ओळख आहे. यावेळी शरद जोशी यांनी गुणवत्तेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे वाचन संस्कृती जोपासण्याचे मोलाचे कार्य अविरतपणे करीत असल्याबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी व डॉ. सतीश ससाणे उपस्थित होते.

About The Author