प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने शहीद हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
लातूर (प्रतिनिधी) : प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूरच्या वतीने संभाजी नगर,खडगाव रोड, नटराज काँमप्लेक्स,लातूर परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त शहिद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाचा सेनापती कासीम रजवी हा क्रूर आणि अन्यायी होता त्याची रजाकार संघटना मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेवर अत्याचार करत होता. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ही महाराष्ट्र परिषद स्थापन झाली यात हैद्राबाद संस्था भारतात सामील व्हावी म्हणून प्रयत्न केले पण निजाम ऐकण्यास तयार नव्हता नंतर ‘वंदे मातरम” या चळवळीद्वारे अनेक तरुण विध्यार्थीनी मराठवाडा निजमापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. नंतर भारताचे पोलाद पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी आँप्रेशन पोलो लष्करी कार्यवाई केली या लष्करी कार्यवाईत निजामाचा संपूर्ण पराभूत झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ साली निजाम शरण आला. आपला मराठवाडा स्वातंत्त्र्य झाला अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले. यासंघर्षात अनेक हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली त्यामुळेच आपला मराठवाडा निजमापासून मुक्त झाला शहीद हुतात्म्यांना विनम्र अभिवादन.
यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी, अँड.सुरेश सलगरे, अँड. आर. के. सोनसाळे, अँड. अशोक जोंधळे, प्रकाश धादगिने, किशोर भुजबळ, प्रकाश नीला, राम घाडगे, मुन्ना भुजबळ, आरवी घाडगे, बाळू चोपडे, महादू दिवे, राजकुमार शेलुकर, अनिल कोतवाद, अंकुश चहल, सतीश पवार, देवा राठोड, शरद सुरवसे,पवन शिंदे, महेश पाटील, ऋषीकेश कोलपुदे, संदीप राठोड, राम मोरे, गोकुळ राठोड, मोहन पालमपल्ले, अमित शिरगिरे, योगेश चव्हाण, तसेच परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.