उदयगिरी महाविद्यालयात श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे वृक्षारोपण
उदगीर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर व बाल संस्कार व युवा प्रबोधन विभाग आयोजित संकल्प एक कोटी वृक्ष लागवड महा – वृक्षारोपण अभियान अंतर्गत 1 जून 2022 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागवड व संवर्धन कार्यक्रम साक्षात परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतासह देश-विदेशात चालू असून त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर जिल्ह्यातील आंध्र, कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या उदगीर शहरातील महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बी.एम संधीकर, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख जे.एम पटवारी,वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख आर.बी अल्लापुरे, लोणी केंद्राच्या प्रमुख रेखा जाधव, वीर हनुमान मंदिर बिदर रोड उदगीर चे प्रमुख एन.आर जवळे,बाल संस्कार विभागाच्या सरिता द्वासे ( हरकरे ) ,रेखा जाधव ,शैला बिरादार, मीना तेलंग, सुनिता हंडरगुळे,अनुसया कंनकुरे, अशा गव्हाणे, मंडोधरी पाटील, माधव स्वामी, वर्षा गोधळे, बाबासाहेब देशमुख, सारिका देशमुख, विशाखा गादा, बंडू काळे, संजय बच्चेवार,शुभांगी नादरगे, सुहास बिरादार, विनायक गादा यांच्यासह कार्यरतसेवेकरी, सेवेकरी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.