धानोरा येथे युवा सेनेची शाखा स्थापन

धानोरा येथे युवा सेनेची शाखा स्थापन

औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथील युवा सेनेच्या शाखेचे उद्‌घाटन महंत राजेंद्र गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून दिनेश जावळे यांची निवड झाल्यानंतर प्रथम शाखेचे उद्‌घाटन धानोरा गावापासून सुरुवात केली. पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे खंबीर उभारण्याचे व त्यांचे हात बळकट करण्यासाठी नव्या जोमाने गाव येथे शाखा स्थापन करण्याचा निर्धार यावेळी नूतन जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव उपतालुकाप्रमुख चंद्रकांत तळेगाव विलास लंगर युवा सेनेचे वैभव लंगर नेताजी भोईबार विपुल पाटील धानोरा गावचे सरपंच सूर्यकांत मुसळे उपसरपंच नागेश कोळपे धानोराव सोसायटीचे चेअरमन विक्रम पाटील ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक मंडळ युवा सेना शाखाप्रमुख चैतन्य पाटील सुशील माने सुमित श्रीमंगले दयानंद मुसळे राहुल कोळपे गणेश कवरे ज्ञानेश्वर कुलकर्णी हनुमंत माने शेखर जवादे सर्व पदाधिकारी माजी पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author