श्यामलाल हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम शालेय प्रांगणात उदगीर शहरातील प्रसिद्ध बाल रोग तज्ञ व या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर रशीद खेडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ध्वजारोहणासाठी प्रमुख अतिथीस पाचारण एन.सी.सी. प्रमुख सोनाळे बालाजी यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्था उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, संस्था सचिव ऍड.विक्रमजी संकाये तसेच संस्था मान्यवर, निमंत्रित अभंगराव कोयले, पी. जी. पाटील, पंडित सुकनीकर भागवत घोळवे, मोहनराव निडवंचे, श्रीहरी टेकुळे,पटने सर, प्रमोद हेरकर,माजी प्रा. कुलकर्णी सर, ऍड. चटणाले, जेष्ठ पत्रकार रामभाऊ मोतीपवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती दिना बद्दल नाईकवाडे अनार्य, देवणी श्रुती, चंदे वैष्णवी, लाला रक्षिता या विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या भाषण केले.
देशभक्तीपर गीत व नृत्य यांचे सादरीकरण कमलापुरे खुशी, श्रेया पाटील, राधिका पवार, सोनाक्षी कांडेकर, राठोड गौरी, बिरादार अमृता, जानवी बिरादार, किवंडे प्रतीक, समर्थ बिरादार, माने अमित, दिनेश कदम, थोरे गणेश इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना सुनील बागडे व उमाकांत सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
देशभक्तीपर गीत व नृत्य सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
डंबेल्स व घुंगरू काठी चे प्रात्यक्षिक सादरीकरण इयत्ता आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सुंदर रित्या केले. या विद्यार्थ्यांना बोळेगावे दिनेश व राजकुमार बिरादार यांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी डॉक्टर रशीद खेडे संस्था सचिव ऍड. विक्रमजी संकाये यांनी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषणपाणि आर्य संस्था सह सचिव अंजुमणीताई आर्य यांनी संदेशाद्वारे सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवटक्के सृष्टी व बेंबडे साक्षी या विद्यार्थिनींनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य उमाकांत सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आनंद चोबळे प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये जेष्ठ शिक्षक संजय देबडवार यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांनी सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.