लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सभासद पुरुषोत्तम नमनगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार तर प्रमुख अतिथी म्हणून संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे,अर्थसमितीचे अध्यक्ष शिवाजीराव बिरादार , संस्था सभासद मोहिनी अचवले ,प्रमुख वक्ते अँड.एकनाथ राऊत ,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी , उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ध्वजाला व सर्व मान्यवरांना एन.सी.सी .च्या विद्यार्थ्यांनी परेडसह शिस्तीत मानवंदना दिली. यावेळी शहरातील गणेशमंडाळानी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत पारितोषिके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे व नवोदय विद्यालयाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्त करण्यात आलेले क्रिडा शिक्षक संतोष कोले यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विज्ञान शिक्षिका सविता कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘इस्रो’या संस्थेवरील हस्तलिखित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. . या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते अँड एकनाथ राऊत यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा धगधगता इतिहास प्रभावी भाषेत सविस्तर मांडला. रजाकाराच्या विविध घटना व प्रसंगाविषयी माहिती सांगात मराठवाडा मुक्तीसाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या त्यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला. या लढ्यात आर्यसमाजाचे योगदान खूप मोलाचे आहे. कारण पहिला हुतात्मा त्यांचा उमरगा तालुक्यात झाला. असे मत मनोगतात त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोपात मधुकर वट्टमवार यांनी सांगितले की मराठवाडामुक्ती साठी आपल्या जनतेने खूप कष्ट सोसले, आपल्या उदगीर शहरातील भुमीपूत्रांनी म्हणजेच श्यामलालजी, बंसिलालजीने मराठवाडा मुक्ती लालासाहेब संग्रामात मोलाचं योगदान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गजलवार, प्रास्ताविक विष्णू तेलंग तर स्वागत व परिचय शोभा नेत्रगावकर यांनी केले.

या कार्यक्रमात सुंदर गीत प्राजंली गिरी या विद्यार्थ्यांनींने सादर केले तर आभारप्रदर्शन सुरेखा शिंदे यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख संतोष कोले , अभ्यासपुरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, विनायक इंगळे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author