पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन सेवा पंधरवडा सुरू
उदगीर( एल.पी. उगिले) : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शहर आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या विद्यमानाने सेवा पंधरवड्याची सुरुवात रक्तदान शिबिराने संपन्न झाली. सर्वप्रथम आपल्या लाडक्या पंतप्रधानांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे. अशी शुभ मंगल कामना करण्यासाठी उदगीरचे दैवत उदागीर बाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन तदनंतर विविध धार्मिक स्थळ भेटी देऊन महा अभिषेक व प्रसाद वाटप करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, उदगीर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ लकी पाटील, भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, माजी नगरसेवक विधीज्ञ दत्ता पाटील, गणेश गायकवाड,सावन पस्तापुरे, अमोल अनकल्ले, शामला कारामुंगे, बबीता पांढरे, मंदाकिनी जीवने, जया काबरा, सुमित बागबंदे, अमर सूर्यवंशी, व्यंकट काकरे, संजय पाटील, आनंद बुंदे, आनंद साबणे, झेरीकुंटे, राजकुमार मुळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या लाडक्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यानच्या काळात सेवा पंधरवडा राबवण्यात येणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदगीर शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांमधून गरजू व गरीब रुग्णांना मोफत तसेच माफक दरात रुग्णसेवा पुरविण्यात आली. अशी ही माहिती मनोज पुदाले यांनी दिली आहे.