पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर नामदेव कदम मित्र मंडळाचे कार्यक्रम सुरू
उदगीर (एल.पी. उगिले) : देशाचे पंतप्रधान स्वच्छतेचे पुजारी नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या पिढीला श्रमप्रतिष्ठेचे मूल्य समजावून सांगण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. त्याचेच औचित्य साधून आरोग्य दूत नामदेवराव कदम मित्र मंडळाच्या वतीने लातूर जिल्हाभर विविध मंदिर, स्वच्छता मोहीम, रुग्णांना फळे वाटप, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गुरुदत्त विद्यालयात वृक्षारोपण तसेच बालाजी मंदिर परिसर स्वच्छता अभियानातून करण्यात आली. त्यानंतर उदगीर, शिरूर ताजबंद, अहमदपूर, चाकूर, लातूर, शिरूर अनंतपाळ, निलंगा, औसा, देवणी येथेही विविध कार्यक्रम संपन्न झाले.
या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जळकोटचे माजी नगराध्यक्ष किशनराव धूळशेटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, रामेश्वर केंद्रे, अरविंद नागरगोजे, बालाजी मालुसरे, दत्तात्रय वंजे, अविनाश नळंदकर, सत्यवान पांडे, विश्वनाथ चाटे, माधव मठदेवरु, पत्रकार संगम डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा बागवान, प्रगतशील व्यावसायिक कल्पेश होट्टे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आरोग्यतून नामदेव कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल हा भारताच्या उज्वल इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा. असा असून जागतिक पातळीवरची स्वच्छता भारतामध्ये देखील राबवली जावी. या आदर्शवादी विचाराने स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्याचे काम देखील पंतप्रधानांनी वेगवेगळ्या माध्यमातून केले असल्याचे स्पष्ट केले. तसेच आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे कदम यांनी भविष्यकाळात लातूर जिल्ह्यात अनेक आरोग्य शिबिरे घेणार असल्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी आजपर्यंत उदगीर, जळकोट तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांवर मुंबई येथे मोफत उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या आहेत.
भविष्यातही गरजूंना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सहकार्यातून शस्त्रक्रिया झालेल्या कुटुंबीयांच्या वतीने नामदेव कदम यांचाही सत्कार करण्यात आला. संपूर्ण जिल्हाभर एकाच वेळी विविध उपक्रम यशस्वीरित्या प्रत्यक्ष राबवणारे हे क्रियाशील मित्र मंडळ असल्याबद्दल त्यांनी सर्व सहकारी मित्रांचे आभारही व्यक्त केले. नामदेव कदम हे सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्व असले तरी, तो एक भाजपचा चेहरा आहे. हेही सत्य असल्याने राजकीय वर्तुळात या अभियानामुळे चर्चेला उधाण आले आहे.