मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर मदत देणे गरजेचे – न्या. सुभेदार

मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर मदत देणे गरजेचे - न्या. सुभेदार

उदगीर (प्रतिनिधी) : मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर मदत देणे गरजेचे असते असे प्रतिपादन उदगीर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश परमेश्वर सुभेदार यांनी केलें. ते तालुका विधि सेवा समिती उदगीर व संधीनिकेतन शिक्षण संस्था वडगाव संचालित जिवनविकास निवासी मतिमंद कर्मशाळा उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानसिक आजारी आणि मानसिक दृष्ट्या अक्षम व्यक्तींना कायदेशीर सेवा या विषयावर आयोजीत कार्यशाळेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिवणविकास निवासी मतिमंद कर्मशाळाचे अधिक्षक राजापटेल अब्दुल मलिक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर जिल्हा न्यायालयचे जिल्हा न्यायाधीश परमेश्वर सुभेदार , दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर चे न्या. निखिल चव्हान, उदगीर येथिल प्रसिध्द मनोरुग्ण चिकित्सक डॉ. जावेद राजेसाब अत्तार, अँड. महेश मळगे , अॅड जमिरोद्धिन जहागिदार , अस्थिव्यंग कर्मशाळाचे अधिक्षक प्रसाद औरादे, गुरूनाथ पाटील , किशोर भालेराव, नागेंद्र साबणे, इरवत भडरवार , आदी ची उपस्थिती होती.

पुढे बोलताना न्या. सुभेदार म्हनाले कि, सर्व सामान्य माणसा पेक्षा या व्यक्तींना आपले आयुष्य कसे जगावे हे समजत नाहीं. त्यामुळे विधी सेवा समिति व कोणतीही स्वयंसेवी संस्थांनी पालकत्व स्वीकारून त्यांना योग्य ती मदत करावी. या बाबतीत सरकारी योजना मिळवून देण्याचे व कायदेशिर सल्ला देण्याचे कार्य करावे. यावेळी न्या.निखिल चव्हान, म्हणाले की, सर्व समाज घटकांना संवीधानाने दिलेला अधिकार आहे.

त्यामुळे दिव्यांग असो की, मानसिक दृष्ट्या आजार असणाऱ्या व्यक्ती असो. त्यांना न्याय हा सारखाच आहे. अशा लोकाच्या मागे न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा तत्पर आहे. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ जावेद अत्तार म्हणले की, मानसिक आजार हा कोणालाही होऊ शकतो. हा आजार रासायनिक जडणघडणीतून उपजत असते, याचे मुख्य कारण म्हणजे ताण तणाव वाढत जाणे हे होय.

आजची जीवन शेली मुळे मनावर ताण पडतो, भावनेचा अतिरेक मुळे मानसिक आजार होतो. हा आजार सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही प्रकारावर अवलंबून आहे. जास्त आनंद व सुख झाले तरी होतो, अति दुःख जीवनातील नेरास्य , रागीट पणा आदी कारण मुळे हा आजार होतो. या आजारामुळे जगात आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता यावर उपचार आहेत, असे ही ते म्हणाले.

या कार्यक्रमा चे प्रास्ताविक महेश मळगे यांनी केले.अध्यक्ष राजापटेल यांनी आपले विचार मांडले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मतिमंद मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!