स्वामी विवेकानंद महाविद्यालय हिंदी दिन उत्साहात साजरा
लातूर (प्रतिनिधी) : 14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. तसेच हिंदी भाषेचे प्रवक्ते राजेंद्र सिंह यांचा 14 सप्टेंबर जन्म दिवस असल्याकारणाने 14 सप्टेंबर 1953 पासून हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हिंदी भाषा जगातील 170 देशात शिकवली किंवा बोलली जाते, जगात सर्वात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा हिंदी आहे. असे मत प्रास्ताविक मांडताना हिंदी विभाग प्रमुख प्रा. सागर यादव यांनी व्यक्त केले. हिंदी दिवस श महाविद्यालयात प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो. विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी हिंदी भाषा उपयोगी ठरते, म्हणून सांस्कृतिक व राष्ट्राच्या जडणघडणेसाठी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या साहित्याचे अध्ययन केलं पाहिजे. यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना नक्कीच निर्माण होते. असे मत अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य मनोज गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज गायकवाड सर होते . या कार्यक्रमाची सुरुवात गोस्वामी तुलसीदास, मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रारंभी ‘राष्ट्र की जय चेतना का गाण वंदे मातरम’ हे गीत स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील सुचिता या विद्यार्थिनीने सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. सागर यादव यांनी केले. यावेळी प्रा. सुमित सातपुते , प्रा. दीक्षा धावरे , प्रा. पूजा राठोड व प्रा. चव्हाण मॅडम उपस्थित होत्या.
हिंदी दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. उरगुंडे नेहा, अभिषेक सोट, अभिषेक पिलाई, प्रथमेश राजे ,आरती चींदे , मनीषा धोंद्रे, साबळे आरती इ. विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुलक्षणा सोनवणे आणि आभार लाड प्रसाद यांनी मानले .