संत ज्ञानेश्वर विद्यालयात 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 75 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दत्ता गलाले, केंद्रप्रमुख वामन सांगुळे तर प्रमुख प्रवक्ते म्हणून शिवश्री शिवशंकर कलावती बालाजी लांडगे ,प्रा.चंद्रकांत मोरे तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक उद्धव शृंगारे, मुख्याध्यापिका आशाताई रोडगे सह पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या तर इयत्ता आठवी ते दहावी साठी वर्ग सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अध्यक्षांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयात सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक 301 रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक 201 रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक 101 रुपये व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदरील विजेत्या विद्यार्थ्यांना त्या त्या वर्ग शिक्षकांकडून बक्षीस देण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. प्रा. दत्ता गलाले, वामन सांगुळे,शिवश्री शिवशंकर कलावती बालाजी लांडगे, प्रा. चंद्रकांत मोरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रोडगे यांनी तर सूत्रसंचालन नंदकुमार मद्देवाड व संगीता आबंदे यांनी तर आभार युवराज गुंडाजी मोरे यांनी मानले शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author