जागतिक चालक दिनानिमित्त नणंद तेथे चालकाचा सत्कार

जागतिक चालक दिनानिमित्त नणंद तेथे चालकाचा सत्कार

निलंगा (प्रतिनिधी) : दि. 17 सप्टेंबर रोजी जागतिक चालक दिनानिमित्त नणंद येथे निलंगा ते किल्लारी एस टी महामंडळाचे निलंगा आगारातील कर्तव्य बजावणाऱ्या चालक दादाराव मुसांडे व वाहक हणमंत पाटील यांचा सत्कार नणंद गावचे सरपंच हरिभाऊ बोळे व उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी यांनी पुष्पहार घालून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य अलीम पटेल, गावातली किरण पाटील, अनंत पाटील, शिवाजी बोधले, कुमार लादे, गणेश पाचंगे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान टाकेकर, मोहन पाटील, बळवंत मुळे, दयानंद पाटील व गावातील नागरीक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!