शेळके कुटुंबाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी केले सांत्वन

शेळके कुटुंबाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी केले सांत्वन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील ममदापूर येथील जेष्ठ नागरिक तथा मांजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष ज्ञानोबा शेळके उर्फ (मामा) यांच्या पत्नी सौ इंदिराबाई ज्ञानोबा शेळके वय वर्ष 81 राहणार ममदापूर तालुका लातूर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्याबद्दल ममदापूर तालुका लातूर येथे शनिवारी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी शेळके कुटुंबाची भेट घेवुन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले व धीर दिला.

यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, ज्ञानोबा शेळके, सतीश शेळके, सतीश पाटील, प्रताप पडीले, जनार्दन वंगवाड, अंगद वंगवाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, वसंत पाटील , दीपक पाटील, प्रकाश वंगवाड,आदी उपस्थित होते.

About The Author