येणकी मनसे तर्फे नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिर संपन्न

येणकी मनसे तर्फे नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे येणकी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेत्र तपासणी,अल्प दरात शस्त्रक्रिया तसेच सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लाॅयन्स क्लब उदगीर उमंग तथा उदयगिरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व रोग निदान शिबिरासाठी आनंद हॉस्पिटल उदगीरचे डॉक्टर अजय सोनटक्के एम डी (मेडीसीन)यांनी वेळ देऊन रुग्णाची तपासणी तथा मोफत औषधे दिले.

या शिबिराचे उद्घाटन मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय राठोड यांनी केले. याप्रसंगी बोलताना मनसे ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारी संघटना असून निवडणुकीच्या राजकारणापेक्षा जनतेच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढा देणारा पक्ष आहे.

गावातील महाराष्ट्र सैनिकांनी गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी शिबिराचे आयोजन केले असून गावातील गोरगरिबांचे काही अडचणी असु द्या. त्या मनसेच्या शाखेतील तरुणांना सांगा, आम्ही त्या सोडवू, तसेच गावातील सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आरोग्याबाबत हायगाई करू नका. आरोग्य आहे तरच बाकी सर्व काही आहे. असे मत व्यक्त केले.

या शिबिरात 350 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संजय राठोड सह डॉक्टर अजय सोनटक्के ,उपसरपंच अरविंद बिरादार, प्रदीप पाटील ,जि प शाळेचे मुख्यध्यापक चंद्रशेखर बिरादार, अंतेश्वर बिरादार, गोविंद पाटील , उमाकांत बिरादार ,मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष बाबुराव जाधव, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष रणजीत भंडे ,व्यापारी सेना तालुका अध्यक्ष योगेश चिद्रेवार, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, लखन पुरी, उमंग चे अध्यक्ष विवेक जैन ,विजय पाटील ,नेत्र रुग्णालयाचे तज्ञ सुमित पाटील , शंकर सोळुंके आदी उपस्थित होते.

या शिबिरासाठी शेतकरी सेनेचे तालुका उपाध्यक्ष अजय भांडे , शाखाध्यक्ष गणेश किनी, म्हेत्रे बिरबल, ऋषिकेश किने, देवराव बिरादार, बालाजी बिरादार, राम श्रीमंगले सह शाखेतील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!