गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाचा गुरुवर्य पुरस्कार प्रो.डॉ. नरसिंग कदम यांना प्रदान

गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाचा गुरुवर्य पुरस्कार प्रो.डॉ. नरसिंग कदम यांना प्रदान

उदगीर (एल.पी. उगिले) : गुनाई शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर यांच्या वतीने गुरुवर्य पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले .लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून काही सत्कारमूर्तींची निवड या ठिकाणी करण्यात आली होती. त्यामध्ये प्रोफेसर कदम नरसिंग यांची त्यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कार्यामुळे निवड झाली. त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक कार्याबद्दल त्यांना या वर्षभरातील हा तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. प्राध्यापक नरसिंग कदम यांनी मागील काळात पाच वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून काम केलेले आहे.
जिल्हाधिकारी नियुक्त दोन वर्षे भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम केलेले आहे. गेल्या 19 वर्षापासून ते मराठीचे अध्यापन करतात .ते कवी ,कथाकार ,वात्रटीकाकार व समीक्षक आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे तालुका समन्वयक, कमवा व शिका योजनेचे समन्वयक ,विवेक वाहिनीचे समन्वयक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत. त्यासोबतच समाजात जाणीव जागृती करण्यासाठी अनेक व्याख्यानांचे आयोजन तसेच स्वतःही अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. अनेक गावांमध्ये वृक्षारोपण ,शोषखड्डे, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर ,रक्तगट तपासणी शिबिर ,पशुरोग निदान शिबिर ,आरोग्य तपासणी शिबिर, असे अनेक शिबिरे त्यांनी राबविलेले आहेत. पल्स पोलिओ, कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती, वैज्ञानिक प्रबोधन जनजागृती, मतदान जनजागृती ,विवेक वाहिनी जनजागृती ,स्वच्छता मोहीम जनजागृती अशा अनेक जनजागृतीसाठी विविध ठिकाणी रॅलींचे आयोजनही त्यांनी केलेले आहेत.
याच कार्याची दखल घेऊन त्यांचा गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाने माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, बापूराव राठोड ,राहुल केंद्रे, दत्ता पवार ,अमित राठोड आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रोफेसर कदम यांना मिळालेल्या या सत्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.

About The Author