मोदींनी अनेक योजनेचा थेट लाभ दिला, मात्र काँग्रेसने गरीबांना गरीबच ठेवले
भाजपाच्या सेवा पंधरवाडा कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी आ. रमेशअप्पा कराड
लातूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणार्या काँगेसने गरीबी हटावचा नारा दिला मात्र गरीबांना गरीबच ठेवले. नरेंद्रजी मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर गोरगरीब, सर्वसामान्य माणसांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांच्या डोळयांतील अश्रू पुसण्याचे काम केले त्याचबरोबर देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावण्याचे मोठे कार्य केले असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी एका कार्यक्रमात केले.
जगातील लोकप्रिय नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचा शुभारंभ रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील तिरूपती विद्यालयात आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्वरोग निदान आरोग्य शिबीराचे उदघाटन, रक्तदान शिबीराचे उदघाटन, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद जवान बालाजी माले यांचे वडील बापुराव माले यांचा सन्मान केंद्र शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार आणि हनुमान चालिसाचे वाटप आ. कराड यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अॅड. अरूणराव चव्हाण हे होते. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक वसंत करमुडे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरे, भागवत सोट, सतिश अंबेकर, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, ओबीसी आघाडीचे विभागीय संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, अनंत चव्हाण, सुकेश भंडारे, सिध्देश्वर मामडगे, चंद्रसेन लोंढे, शरद दरेकर, महेंद्र गोडभरले, प्रकाश गालफाडे, किशोर श्रीगीरे यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणारा हा पानगाव परीसर असून मुंडे साहेबांच्याच आशिर्वादाने मला विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. लातूर जिल्हयात भाजपाचे संघटनात्मक काम भक्कम असून पक्षाने आजपर्यंत दिलेले विविध सर्व कार्यक्रम प्रभाविपणे राबविले असून या कामाची दखल राज्यानेच नव्हे तर देशाच्या भाजपा नेतृत्वाने घेतली असल्याचे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमीत्त लातूर जिल्हयात भाजपाच्या वतीने नाविन्यपुर्ण सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार असल्याचे सांगून राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गोरगरीबांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर करणारा आणि योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने देशाला लाभला. संपूर्ण देशभरात सर्वच क्षेत्रातील विकासाला गती मिळाली असल्याचे सांगून देशभर केलेल्या कामाच्या आधारावर नरेंद्रजी मोदी यांना कोणीही हटवू शकणार नाही येत्या सन २०३४ पर्यंत हेच देशाचे पंतप्रधान राहणार असल्याचे आ. रमेशअप्प कराड यांनी बोलून दाखविले. केवळ वसुलीचे काम करणारे महाविकास आघाडी सरकार जावून शेतकर्यांसह जनतेच्या हिताची जपणूक करणारे एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सेना भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. गोगलगायीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांना या सरकारने जाहीर केलेली मदत दोन दिवसांत मिळणार असून अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळेही नुकसानीत आलेल्या शेतकर्यांना दिवाळीपर्यंत मदत मिळणार असल्याचे सांगून आ. रमेशअप्पा कराड यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात फुटक्या दमडीचीही शेतकर्यांना मदत दिली नाही असे बोलून दाखविले.
पानगाव येथील प्राचीनकालीन विठ्ठल रूक्मीणी मंदिर जतन व्हावे यासाठी पुरातन विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रूपयाचा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पानगावच्या विकासाचे सर्व प्रस्ताव तयार करावेत या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही देवून पानगाव रेल्वे स्थानकात लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा याकरीता रेल्वे मंत्र्याकडे निश्चितपणे पाठपुरावा करू असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, पानगाव हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत उमेदवार कोणीही असो कमळाच्या चिन्हालाच विक्रमी मताने विजयी करून पुन्हा एकदा पानगाव हा भाजपाचा बालेकिल्ला आहे हे सिध्द करावे असे आवाहन केले.
सर्व गटातटांनी एकत्रीत येवून पानगावच्या भाजपाची ताकद येणार्या निवडणूकीत दाखवून द्यावी असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अरूण चव्हाण यांनी बोलून दाखविले. तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांनी सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची माहिती देवून आ. रमेशअप्पा कराड यांच्यामुळे रेणापूर तालुक्यातील विविध विकास कामांना गती मिळाली असल्याचे सांगितले. प्रारंभी अमर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रामचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे, अॅड, सुधाकर बोराडे, बालासाहेब यादव तर शेवटी गणेश तूरूप यांनी आभार मानले. प्रारंभी आ. रमेशअप्पा कराड यांनी शहीद जवान बालाजी माले यांच्या स्मारक स्थळी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. श्री विठ्ठल रूक्मीणी मंदिराची पाहणी केली तर पानगाव येथील भाजयुमोच्या विविध शाखांचे उद्धाटन आणि प्रकाश गालफाडे यांच्या भाजपा कार्यालयाचा शुभारंभ आ. कराड यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात पानगाव, रामवाडी, नरवटवाडी, फावडेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने आ. कराड यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमास जेष्ठ नेते किशनराव भंडारे, व्यंकटराव अनामे, उत्तरेश्वर हेरकर, जगन्नाथ राचूरे, माधव गुडे, धर्मराज मोटाडे, श्रीकृष्ण जाधव, हरीकृष्ण गुर्ले, ललिता कांबळे, शीला आचार्य, अनुसया फड, भागवत गीते, विजय चव्हाण, गोपाळ शेंडगे, श्रीकृष्ण मोटेगावकर, रमाकांत संपत्ते, श्रीमंत नागरगोजे, राजकुमार आलापुरे, गणेश चव्हाण, धनंजय म्हेत्रे, श्रीकृष्ण पवार, वीरेंद्र चव्हाण, मारूती गालफाडे, रमाकांत फुलारी, गोपाळ पाटील, काशिनाथ ढगे, राजकिरण साठे, नागथराव गिते, बंडू केंद्रे, काशिनाथ सांगळे, राम केंद्रे, रवी मोहिते, शेखर परदेशी, शालीक गोडभोरले, प्रल्हाद फुलारी, राजकुमार कांबळे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, सर्व स्तरातील नागरीक भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.