सानेटरी वर्कर साठी मोफत आरोग्य शिबीर

सानेटरी वर्कर साठी मोफत आरोग्य शिबीर

उदगीर (प्रतिनिधी) : येथे नगर परिषद आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत सानेटरी वर्कर साठी मोफत आरोग्य शिबिर :नगर परीषद प्राथमिक केंद्र उदगीर यांच्या अंतर्गत असंसर्गजन्य रोग निदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी डॉ. इरशाद शेख सर,मधुर डायबिटीज सुपरस्पेशालिटी चे डॉ . प्रशांत नवटके उपस्थित होते. यावेळी 109 लोकाची मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. यावेळी 109 जणांपैकी 31 जण रक्तदाबाचे तर 24 मधुमेही रुग्ण आढळून आले. मधुमेहावर व रक्तदाबावर कसे नियंत्रणित ठेवायचे याचे मार्गदर्शन डॉ. नवटके यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कांबळे सिस्टर, संध्या जाधव, काळदे मिनाक्षी, शेख, भारती, केशव बिरादार, स्वप्निल फुलारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!