मलकापूर ग्रामपंचायत विकासासाठी वचनबद्ध – सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील
उदगीर ( प्रतिनिधी) : मलकापूर येथील ग्रामपंचायतच्या विकासासाठी निधी कधीच कमी पडणार नाही असे उद्गार सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी व्यक्त केले ते ग्रामपंचायतीच्या वतीने 43 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मलकापूर ग्रामपंचायतीच्यावने विविध विकास निधीतून विविध विकासमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यात नविन वसाहत नळेगाव रोड एस.टी.काॅलणी येथे आमदार विक्रम काळे यांच्या निधीतून दहा लक्ष रुपये सिमेंट रस्ता,ग्राम पंचायतच्या वतीने 15 व्या वित्त आयोगातून 5 लक्ष रुपयाचे नाली बांधकाम,15 वा वित्त आयोग जि.प. स्तर 3 लक्ष रुपये नाली बांधकाम,व समर्थ नगर मध्ये 5 लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ता, तांडावस्ती सुधार योजनेतून मित्र नगर येथे 7 लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ता ,ग्रामंपचायतच्या वतीने 15 लक्ष रुपये ग्रामंपचायत कार्यालया समोर ,प्रकाश बिरादार यांचे घर व सावळे घर ते पाणंद रस्ता चे काम ,मोरे घर ते पटवारी घर सिमेंट रस्ता 5लक्ष रुपये, तर ग्रामपंचायतच्यावतीने एस.टी.काॅलणी येथील गार्डनचे सुशोभिकरण 1 लक्ष 60 हजार रुपये असे एकुण 43 लक्ष 60 हजार रुपयाच्या या कामाचे उद्दघाटन बाजार समितीचे सभापती तथा उपसरपंच सिध्देश्वर उर्फ मुन्ना पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्राची प्रताप भालेराव,ग्राम सेवक संतोष पाटिल, ग्रामपंचायत सदस्य गूरूनाथ अण्णा बिरादार, शिवलिंग मुळे , खताळताई ,महबूब शेख, शेख गणी ,अजय नवलखेडे,ज्ञानेश्वर सावळे,ज्ञानेश्वर जाधव,विस्तार अधिकारी देवणी व्हि.एस.कांबळे,अखिल शेख,मोरे, ग्रा.प.चे लिपिक शिवराज ब्रम्हणा यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यापूर्वी देखील आमदार संजय बनसोडे यांच्या विकास निधीतून अनेक कामे पूर्ण झाली आहेत तसेच अनेक कामे प्रस्थापित असून मलकापूर ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत असा विश्वासही याप्रसंगी सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.