सानेटरी वर्कर साठी मोफत आरोग्य शिबीर

सानेटरी वर्कर साठी मोफत आरोग्य शिबीर

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथे नगर परिषद आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत सानेटरी वर्कर साठी मोफत असंसर्गजन्य रोग निदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी डॉ. इरशाद शेख ,मधुर डायबिटीज सुपरस्पेशालिटी चे डॉ . प्रशांत नवटके उपस्थित होते. यावेळी 109 लोकाची मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. यावेळी 109 जणांपैकी 31 जण रक्तदाबाचे तर 24 मधुमेही रुग्ण आढळून आले. मधुमेहावर व रक्तदाबावर कसे नियंत्रणित ठेवायचे याचे मार्गदर्शन डॉ.नवटके यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कांबळे सिस्टर ,संध्या जाधव ,काळदे मिनाक्षी, शेख ,भारती , केशव बिरादार, स्वप्निल फुलारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author