दयानंद कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ. प्रशांत मान्नीकर
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ. प्रशांत मान्नीकर निवड झाल्या बद्दल त्यांचा ‘17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड वर्धापन दिनाच्या’ संयुक्त ध्वजारोहण प्रसंगी दयानंद शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रशांत मान्नीकर हे 2003 पासून दयानंद कला महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत आहेत. त्यांची 2009 पासून त्यांची इंग्रजी विभाग प्रमुख, 2016 पासून संशोधन मार्गदर्शक म्हणून, तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अभ्यास मंडळावरती ते कार्यरत आहेत.
या सत्कार प्रसंगी दयानंद शिक्षण संस्था सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, सदस्य विशालजी लाहोटी, विशालजी अग्रवाल तसेच दयानंद शिक्षण संस्था संचलीत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधिक्षक रुपचंद कुरे, प्राध्यापक तसेच प्रशासकीय कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.