देवणी येथे कचरा मुक्त घनकचरा व्यवस्थापन विलगीकरण प्रदर्शन
देवणी (प्रतिनिधी) : नगरपंचायत कार्यालय अंतर्गत देवणी शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच इंडियन स्वच्छता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर ची सुरुवात प्लास्टिक बंदी व कचरामुक्त घनकचरा व्यवस्थापन व ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कचरा प्रदर्शन भरवून सुरुवात करण्यात आली. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी यांच्यात अंतर्गत स्पर्धा घेऊन तसेच संपूर्ण देवणी येथे नागरिकांना प्रत्यक्ष भेटी देऊन कचरा विलगीकरणाचे व व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यात नगरपंचायतीचे अध्यक्ष डॉ. कीर्ती घोरपडे, उपाध्यक्ष अमित मानकरी, सर्व सभापती नगरसेवकांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी चेतन कुमार माळी,सी.सी.ए.एम.खंदारे व नगरपंचायतीचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांचाही प्रामुख्याने सहभाग आहे. सदरील मोहिमेसाठी सह आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला. या प्रदर्शनात ग्रामस्थ महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. स्वच्छता अधिकारी खंदारे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.