कृष्णा कुलकर्णी यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

कृष्णा कुलकर्णी यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातून १२ वी बोर्ड परीक्षेत सी ई टी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कृष्णा हारिराम कुलकर्णी यांचा सोमवारी आशियाना निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार वैजनाथ राव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे संचालक धनराज दाताळ, बोळंगे साहेब, काँग्रेस मिडिया सेल चे जिल्हाध्यक्ष पत्रकार हरीराम कुलकर्णी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ, एन आर पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, सचिन दाताळ, आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!