लालबहादुर शास्त्री विद्यालयाचा ‘मानस देशमुख’ जिल्ह्यात सर्वप्रथम
उदगीर (एल.पी. उगिले) : जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाचा चि.मानस संजय देशमुख (इयत्ता आठवी) या विद्यार्थ्यांने जिल्ह्यात सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम निमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांच्या हस्ते मानस देशमुखचा जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि उदगीरचे आमदार संजयभाऊ बनसोडे, तसेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे इ. मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
‘मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूर जिल्ह्याचे योगदान’ असा निबंध स्पर्धेचा विषय होता.मानस देशमुख या विद्यार्थ्यांस मराठी शिक्षिका अनिता यलमटे व गुरूदत्त महामुनी यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतन्पा हुरदळे ,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सर्वगुण संपन्न आसणारा ‘मानस देशमुख’ या विद्यार्थ्यांचा आम्हांला नेहमीच अभिमान वाटतो.या स्पर्धेच्या युगात कलेवर व वाचनसंस्कृती जोपासणारा आमचा हा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आला.मानसचे व त्याच्या पालकाचे खूप अभिनंदन – प्रदीप कुलकर्णी, मुख्याध्यापक
सध्याच्या स्पर्धेच्या युगात केवळ अभ्यासक्रमाला महत्व देत जीवघेण्या स्पर्धेत मुले धावणार्या या काळात ‘मानस’ वाचनलेखन व कलेवर नितांत प्रेम करतो,हे त्याचे वेगळेपण आहे.अतिशय गुणी व प्रतिभासंपन्न असणाऱ्या मानसचे यश विद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. – अनिता यलमटे, मार्गदर्शक शिक्षिका