खाजगी संस्थेच्या 14 शाळांना आमदार फंडातून संगणक देणार – आ.बनसोडे
उदगीर (एल.पी. उगिले) : सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण कर्मचारी पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. सभेस प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजयजी बनसोडे , जिल्हा बँकेचे संचालक अशोकरावजी गोविंदपुरकर , काँग्रेसच्या युवा नेत्या प्रीती भोसले या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आ. बनसोडे यांनी आपल्या भाषणामध्ये असे जाहीर केले की, पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रात एकूण 14 शाळा आहेत. या शाळेला आमदार फंडातून प्रत्येकी एक एक कम्प्युटर देण्याचे जाहीर केले. तसेच पतसंस्थेच्या विकासामध्ये जडणघडणीमध्ये शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष बेंबडे व्हि.एस यांनी कर्ज मर्यादा वाढीव 30 लाखाची व आकस्मिक कर्ज 50 हजार रुपयांचे करण्याचे ठराव घेऊन घोषित केले.
तसेच यावर्षी दिला जाणारा लाभांश सभासदाला आठ टक्के जाहीर केला. संस्थेचे सचिव यांनी अहवाल वाचन केले तसेच वंगाटे .डी .एन ची मानद सचिव म्हणून वार्षिक सर्वसाधारण मध्ये बहुमताने निवड झाली. अध्यक्ष यांच्या वतीने सभा संपन्न झाली असे जाहीर केले. सर्व संचालक मंडळ, संस्थेचे उपाध्यक्ष एस बी पाटील ,संचालक जाधव एच .डी ,संचालक गीते एन .पी, संचालक देवकते, संचालक पाटील इत्यादी उपस्थित होते.