डॉ. अमित पाटील व डॉ. आशिष पाटील यांचा मुस्लिम युनायटेड फोरम च्या वतीने सत्कार

डॉ. अमित पाटील व डॉ. आशिष पाटील यांचा मुस्लिम युनायटेड फोरम च्या वतीने सत्कार

उदगीर [एल.पी. उगीले ] : उदगीर तालुक्याचे सुपुत्र सध्या मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत असलेले प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. अमित पाटील व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. आशिष पाटील बंधू पुणे, मुंबई येथे उपलब्ध असलेल्या महागड्या व गुंतागुंतीच्या अशा कॅन्सर व अस्थिरोग सर्जरी या सारख्या आरोग्य सेवा उदगीर येथे सर्व सामान्य रुग्णांकरीता उपलब्ध करणार आहेत.

त्याच्या या सेवावृती बद्दल पाटील बंधूचे मुस्लिम युनायटेड फोरम उदगीरच्या वतीने सत्कार केला. या वेळी मोहमद मुन्तजीब , मोहम्मद हफिज भाई ,मंजुर खाँ पठाण ,अहमद सरवर, डॉ. ईसा खान, डॉ. सादिक पटेल, डॉ. शफीक, मौलान जाकेर,अझरोदीन शेख, शेख इरफान, अजहर चाऊस, विधिज्ञ जिशान शेख, अजहर शेख, शेख अवेस आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!