महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे महिला बचत गटाला कर्ज वितरण

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे महिला बचत गटाला कर्ज वितरण

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक शाखा शिरूर अनंतपाळ तर्फे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील महिला बचत गटांना स्थायी समितीचे सदस्य रमेश बाबूराव बिराजदार यांच्याहस्ते कर्जाचे विरतण करण्यात आले. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्यावतीने नेहमी सामाजिक दायित्व लक्षात घेवून बचतगटांना अत्यल्पदराने कर्ज वाटप केले जाते. त्याच धर्तीवर यंदाही महाराष्ट्र नागरी सहकारी बँक शाखा शिरूर अनंतपाळच्यावतीने स्थायी समिती सदस्यांच्या उपस्थितीत महिला बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे सदस्य रमेश बाबूराव बिराजदार, पंडीत विश्‍वनाथ शिंदाळकर, आप्पाराव यादवराव नाटकरे यांच्यासह बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पिग्मि प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

About The Author