राज्यस्तरीय टॅलेंट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार
लातूर (प्रतिनिधी) :शासनमान्य महाराष्ट्र टॅलेंट सर्च राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून अभिनंदन केले व यापुढील काळातही शिक्षण क्षेत्रात अशीच उतुंग भरारी घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या.
शालेय विद्यार्थ्यांची टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेण्यात आली. या परीक्षेत रेणापूर तालुक्यातील मौजे पोहरेगाव येथील चि. पार्थ परमेश्वर जाधव या विद्यार्थ्याने इयत्ता तिसरी मधून राज्यात पहिला क्रमांक मिळविला. इयत्ता दुसरी मधून राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयातील चि. स्वयंम प्रमोद मंत्री आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधील चि. बाबा देवांश राहूल या दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला तर सोमानी विद्यालयातील विद्यार्थिनी कु. समृद्धी शंकर सुळे हि इयत्ता चौथी मधून राज्यात दुसरी आली आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी श्री पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहारे, रेणापूर तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, एमटीएस मराठवाडा विभाग प्रमुख शंभुलिंग विश्वनाथ नागुरे, डॉ. अजित कुमार मूळजे, शैलेश तत्तापुरे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे आई-वडील व इतर अनेक जण होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
