स्कायलाईन इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश

स्कायलाईन इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवछत्रपती युवक गणेश मंडळ उदगीर तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत स्कायलाईन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.वेशभुषा स्पर्धेत सोम्या सिंग तृतीय, तुषार वाडेकर व्दितीय, भाकसखेडे किरण प्रथम ,साहिबा उजेडे व्दितीय,अनुज जाधव व्दितीय,तरभाषण स्पर्धेत विराज सुर्यवंशी द्वितीय, श्रावणी सुरवसे द्वितीय यांने क्रमांक प्राप्त केला आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,डीवायएसपी डँनियल बेन, पोलिस निरीक्षक गोरख दिवे,पोलिस उपनिरीक्षक एडके सर, बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर मुन्ना पाटील,सतिश पाटील ,मदन पाटील,बिपीन पाटील,बाळासाहेब पाटोदे,यंशवत पाटील,प्रकाश साखरे,दत्ता पाटील,राहुल अतणुरे यांच्या शुभहस्ते बक्षिस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या यशस्वी विद्यार्थी शाळेच्या प्राचार्या.अंजुम शेख,बिरादार रेखा, खंडराज गायकवाड, कळसे संध्या,अंजली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशस्वीतेबदल संस्थाध्यक्ष खाजासाब शेख होनाळीकर, संस्था सचिव प्रा.जावेद शेख होनाळीकर यांनी कौतुक केले.

About The Author

error: Content is protected !!