उदयगिरीच्या दोन प्राध्यापकांना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

उदयगिरीच्या दोन प्राध्यापकांना महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

उदगीर (एल.पी. उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ.बी.एस.भुक्‍तरे आणि प्राणिशास्त्र विभागातील प्रा.डॉ. पी.एस.शेटे यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार लातूर येथे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे उपकुलसचिव डॉ.रवी सरोदे यांच्या हस्ते व प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड आणि प्रोटॉन विभागीय अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम मोरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!