महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे सीईटी परीक्षेत सुयश

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे सीईटी परीक्षेत सुयश

उदगीर (एल.पी. उगिले) : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष च्या वतीने 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत पीसीएम गटातून महाविद्यालयातून प्रथम मलकजी ओझर सरफराज 99.95 पर्सेंटाइल, द्वितीय प्रदीप राजकुमार गुंडले 98.59 पर्सेंटाइल, तृतीय मठपती शिवम विवेकानंद 98 पर्सेंटाइल, पीसीबी गटातून महाविद्यालयात प्रथम भांगे मैथिली साहेबराव 98.61 पर्सेंटाइल, बेद्रे साक्षी राजेंद्र 94.89 पर्सेंटाइल, स्वामी प्रथमेश शशिकांत 94.4 पर्सेंटाइल गुण प्राप्त केले आहेत. 14 विद्यार्थ्यांना 80 पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के उपप्राचार्य सी.एम.भद्रे, पर्यवेक्षक प्रा.जे. आर.कांदे, पर्यवेक्षक प्रा.एस. जी.कोडचे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!